दोन जणांवर गुन्हे दाखल, खर्चाची वसुली होणार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सातारा भागातील गट क्रमांक ४ मध्ये नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने धडक कारवाई करत हटवले. याप्रकरणी बेकायदा बांधकाम करणारे अनिल सांगवी आणि अनिल संचेती यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, अतिक्रमण हटवण्यासाठी आलेला संपूर्ण खर्च पालिकेच्या वतीने संबंधित दोन्ही व्यक्तींकडूनच वसूल केला जाणार आहे.
नाल्यावरील या बेकायदा अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे तक्रार प्राप्त झाली होती. यावर अतिक्रमण हटाव विभागाचे
TATA HITACHI
संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी रीतसर सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आल्याचे
या स्पष्ट झाले. संबंधितांनी नाल्यात सिमेंटचे पाइप टाकून व संरक्षक भिंत उभारून नाला वळवण्याचा प्रयत्न केला होता. अडथळ्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून संपूर्ण परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची मोठी भीती होती. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने हे बांधकाम जमीनदोस्त घेतला. करण्याचा निर्णय नाल्यात बेकायदेशीरपणे टाकलेले ६३ सिमेंट पाईप्स जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले आणि नाला मोकळा करण्यात आला. ही कारवाई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत बिहारे, संजय सुरडकर, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, रवींद्र देसाई, अशोक कदम आदींच्या पथकाने पूर्ण केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











