मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप घेतल्यानंतर संजय राऊत हे थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये मतदार याद्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगतिलं जात आहे. तसेच इतर राजकीय विषयांवरही या दोन्ही नेत्यांकडे चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात असून या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भेटीनंतर राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांनी एसआयआरच्या घोटाळ्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. नवी मुंबईतील भाजपच्या कार्यालयातून एसआरएचे ड्युप्लिकेट फॉर्म भरले जात होते. आपल्याला हवे असलेले मतदार एसआयआरच्या माध्यमातून ठेवायचे हा भाजपचा छुपा अजेंडा आहे. जे मतदार त्यांच्या विरोधात मतदान करू शकतात, अशा समाजातील लोकं यादीतून वगळायचे काम सुरू आहे. त्यामुळे एसआयआरच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. भाजप जिंकण्यासाठी नवीन नवीन फंडे आणत असतो. कधी ईव्हीएम घोटाळे, कधी पैशाचे वाटप, कधी मतदार यादीत घोटाळे, आता एसआयआर आणलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
ठाकरे भेटीत काय चर्चा?
राऊत यांनी एसआयआर आणि मतदार यादीवर आक्षेप घेतल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. राज ठाकरे यांच्याशी त्यांची एसआयआरवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनीही एसआयआरच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे या भेटीत काय ठरतं? काय निर्णय होतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या भेटीत दोन्ही नेते राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या भेटीत कशा कशावर चर्चा होते? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत हे मीडियासी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे राऊत या भेटीबाबत काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.