मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा

Foto
कन्नड,  : तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपयांचे अनुदान द्यावे आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे सोमवारी शहरातील पिशोर नाका येथे तासभर धरणे आंदोलन करण्यात आले. 

माजी आमदार नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकत्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील खरीप पिके पूर्णपणे वाया गेली असून शेतकरी संकटात सापडला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. 

या वेळी २०२४ मधील चकीत पीकविमा व अनुदान त्वरित जमा करावे, पाणी असूनही शेतकऱ्यांनी दिला आहे. धावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. पिकांचे पंचनामे करून २५ टक्के आगाऊ पीकविमा द्यावा, कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करावी आदी मागण्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश तांबे, दत्ता गायकवाड, गणेश बाहुले, वाल्मीक गिरी, महेश तांबे, गणेश पादेकर आदो शेतकरी उपस्थित होते.