शहर पोलीस दलात मोठे फेरबदल...

Foto
सिटी चौक, उस्मानपुरा, वेदांतनगरला नवे निरीक्षक
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): शहर पोलीस दलात शुक्रवारी (दि. २८) मोठे फेरबदल करण्यात असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहेत. राज्याच्या विविध भागांतून बदली होऊन शहरात आलेल्या अधिकाऱ्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या बदलांमध्ये सिटी चौक, उस्मानपुरा आणि वेदांतनगरसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवे पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
जळगावहून आलेले सचिन सानप आता सिटी चौक ठाण्याचे नवे प्रभारी असतील. बीड येथून आलेल्या अशोक मुदिराज यांच्याकडे उस्मानपुरा, तर मुंबईहून आलेले मुकुंद पालवे यांच्याकडे वेदांतनगर ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. संग्राम ताटे यांची उस्मानपुरा ठाण्यातून उच्च न्यायालय सुरक्षा विभागात, राजेश यादव यांची उच्च न्यायालय सुरक्षेतून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मुंबईहून आलेल्या नितु तायडे यांच्याकडे वाहतूक शाखेचे (शहर २) प्रभारीपद देण्यात आले आहे. शेषराव खटाणे यांना जालना पोलीस ठाण्यातून एमआयडीसी सिडको ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. मनीष कल्याणकर यांच्याकडे द.वि. पथक आणि एएचटीयूचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
सोमनाथ जाधव यांची पिंपरी चिंचवड येथे बदली
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्याकडे सायबरचा अतिरिक्त पदभार तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे.
सपोनि सानप जिन्सी ठाण्यात
सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव सानप यांना जिन्सी ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. जयश्री कुलकर्णी यांच्याकडे 'सीसीसी' विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. कदिर देशमुख यांची क्रांती चौक ठाण्यात बदली करण्यात आली आहे. फौजदार राहुल बिघोत यांची सिडको ठाण्यात, विष्णू वाघ यांची आरसीपी विभागात बदली करण्यात आली आह. अर्जुन दांडेगावकर यांना हसूल ठाण्यात, मुकींद मुंढे यांना जिन्सी ठाण्यात, तर किरण बौराडे यांना उस्मानपुरा ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions