मी केवळ केवळ मुस्लिमांचा नाही तर औरंगाबादवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा खासदार - इम्तियाज जलील

Foto
औरंगाबाद: मला लोकसभेत पाठ्वण्यामध्ये केवळ मुस्लिम आणि समाजाचा हातभार नाही तर औरंगाबाद शहरावर प्रेम करणाऱ्या सर्वांनीच मला मतदान केले आहे. त्यामुळे मी केवळ मुस्लिमांचा किंवा दलितांचा खासदार नाही तर संपूर्ण औरंगाबादचा खासदार आहे असे मत खा. इम्तियाज जलील यांनी मांडले आहे. आज गोर बाजार समाजातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. 

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा काही कारणांनी पराभव झाला. मात्र, ते माझ्यासोबत लोकसभेत पाहिजे होते,अशी खंत जलील यांनी यावेळी बोलून दाखवली. बंजारा समाजाला उद्देशून बोलताना ते म्हणले की समाजाचे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न सोडवायचे असतील तर वंचित आघाडीचे आमदार विधानसभेत पाठवा. राधाकृष्ण् मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला खा. इम्तियाज जलील हे प्रमुख पाहुणे तर अँड प्रकाश आंबेडकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर राजपालसिंग राठोड, मनसेचे जि.प. सदस्य  विजय चव्हाण, प्रल्हाद राठोड, कृष्ण बनकार यांसह विविध नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा तो सिर्फ झाँकी, पिक्चर अभी ... 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा जरी एकाच उमेदवार निवडून आला असला तरी वंचित आघाडीला लोकांनी मोठ्या प्रमाणावर मते दिली. अनेक ठिकाणी आपण दुसऱ्या तर काही ठिकाणी तिसऱ्या स्थानी होतो. त्यामुळे ''लोकसभा तो सिर्फ झाँकी है असली पिक्चर अभी बाकी है'' असं जलील यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटासह एकाच जल्लोष झाला. 


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker