औरंगाबाद: एका अल्पवयीन मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवून रीतसर चौकशी करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. या वादात आता कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीदेखील उडी घेतली आहे. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातू त्यांनी एमआयएम वर निशाणा साधला आहे.
त्या अल्पवयीन मुलाचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी आहे. त्याचा लवकरात लवकर शोध लावावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. तसेच एमआयमे पक्षाने आपल्या औकातीवर येऊ नये अन्यथा एमआयएम संपवायला पाच मिनिटेसुद्धा लागणार नाहीत असा दम त्यांनी इम्तियाज जलील यांना भरला. एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्याबद्दल एमआयएम ने माझी मागावी आणि संबंधित कृत्य करणाऱ्या आणि त्याच्या बोलवित्या धानीवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी आणि जर पोलीस जर कारवाई करणार नसतील तर हर्षवर्धन जाधव गुन्हेगारांना शासन करण्यास समर्थ आहे असे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.