युद्धात ही दोन सैन्य बलात्काराला शस्त्र बनवतात, युएनकडून ब्लॅकलिस्ट, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Foto
नवी दिल्ली : इस्रायल आणि रशियन सैन्याला संयुक्त राष्ट्राने ब्लॅकलिस्ट केलं आहे. युद्धा दरम्यान लैंगिक हिंसाचार करणार्‍या समूहामध्ये या दोन देशाच्या सैन्याचा समावेश केला आहे.  युएनकडून दरवर्षी ही लिस्ट जाहीर केली जाते. युद्धा दरम्यान संघटित पद्धतीने लैंगिक हिंसाचार करण्याचा आरोप असलेल्या सरकारी आणि बिगर सरकारी समूहांना या लिस्टमध्ये टाकलं जाते.

यूएनच्या या लिस्टमध्ये फक्त इस्रायल, रशियाचं नाही तर सूदान, हैती, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, म्यानमार, सीरिया आणि माली सारखे देशही आहेत. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात  चे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल आणि रशियाचं नाव या लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा दिला होता. युक्रेन युद्ध आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाइनच्या भागात लैंगिक हिंसाचाराच्या घटना आणि त्यांचा एक पॅटर्न समोर आला आहे. यूएनने या गोष्टी नमूद केल्या आहेत.

सुरक्षा परिषदेच्या सदस्यांपर्यंत पोहोचण्याआधीच  युएनने हा रिपोर्ट पाहिला आहे. २०२५ साली इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाइनच्या भागात अटकेत ठेवलेल्या पॅलेस्टिनी विरोधात लैंगिक हिंसाचाराची प्रकरणे समोर आली आहेत, असे इस्रायलबद्दल या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. युएनने पुष्टि केलेल्या प्रकरणात अनेक वर्षांपासून सुर असलेला पॅटर्न दिसतो. इस्रायलच्या जेलपर्यंत जाण्याची परवानगी मिळत नसल्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाहीफफ असं रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

एंटोनियो गुटेरेस यांचा हा निर्णय अत्यंत लज्जास्पद आणि तथ्यहीन असल्याचं इस्रायलने म्हटले आहे. हमास सोबत आम्हाला जोडण्याचा हा खोटा प्रयत्न आहे. हमास आधीपासूनच या यादीत आहे अशी प्रतिक्रिया इस्रायलने दिली.संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, आता आमचे या सरचिटणीसाबरोबर काम संपले आहे. गुटेरेस यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे. तो पर्यंत सरचिटणीसाच्या कार्यालयासोबत आम्ही आमचे संबंध संपवत आहोत. दरम्यान युएनला आम्ही चौकशीपासून थांबवलं नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.  युएनच्या प्रतिनिधींना इस्रायलला येऊन चौकशी करण्याचं आम्ही निमंत्रण दिलं होतं. पण त्यांनीच यायला नकार दिला व इस्रायल विरुद्ध अभियान कायम ठेवले  असे इस्रायली राजदूत डॅनी डॅनन म्हणाले.