पालोद प्राथमिक आरोग्य केंद्रात 'हिरकणी कक्षा'चे लोकार्पण

Foto
 जि. प. सदस्य देविदास पालोदकर यांच्या हस्ते मातांसाठी विशेष सुविधेचे उद्घाटन

सिल्लोड, (प्रतिनिधी) :   महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या पुढाकाराने आणि जिल्हा नियोजन समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या निधीतून पालोद (ता. सिल्लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनपान करणाऱ्या मातांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष 'हिरकणी कक्षा'चे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर यांच्या हस्ते संपन्न झाले.


ग्रामीण भागातील स्तनपान करणाऱ्या मातांना सुरक्षित व खाजगी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने उभारलेल्या या सुविधेची पाहणी केल्यानंतर, देविदास पालोदकर यांनी आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पालोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा आता रुग्णसेवेसाठी सज्ज झाली आहे.

या लोकार्पण सोहळ्यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश शिंदे, प्रकल्प अधिकारी वैशाली काळवाघे, आरोग्य परिचारिका अर्चना संन्सासे, महिला आरोग्य सेविका मंगल निकाळजे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी दादाराव साळवे व संदीप शिंदे, लिपिक रविंद्र उबाळे आणि परिचर ऋषीदास कोकारे उपस्थित होते. तसेच, याप्रसंगी मुकेश पालोदकर, निखिल पालोदकर, संतोष पालोदकर, ज्ञानेश्वर समिद्रे, रईस खान आणि आक्रम शेख यांच्यासह स्थानिक नागरिक, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.