रांजणगाव येथे विकासकामांचे लोकार्पण

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील रांजणगाव (खुरी) येथे गुरुवारी (ता. सहा) विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. ५० लाख रुपये खर्चाच्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते झाले.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार भुमरे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. तसेच तीर्थक्षेत्र यात्रेसह खासदार संदीपान भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. 

यामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रांजणगाव-दर्गा गाडेगाव रस्ता, श्री स्वामी समर्थ सभागृह, सती माता सभागृह, व्यायामशाळा, छत्रपती संभाजी विद्यालय ते लघाने वस्ती मार्ग, शेंदूरवाडा एमआयडीसी ते प्रधानमंत्री ग्राम सडक मार्ग,
म्हारोळा ते ईनामे वस्ती रस्ता, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लेंडी नदीवरील नऊ सिमेंट बंधारे तसेच दर्गा-हनुमान मंदिर-खाम नदी सिमेंट रस्त्याचा समावेश आहे.

याचवेळी रांजणगाव (खुरी) ते पैठणखेडा रस्ता, रांजणी ते शेकटा रस्ता, मुख्यमंत्री सौर किसान वाहिनी प्रकल्प, म्हारोळा ते रांजणगाव (खुरी) रस्ता, गणपती मंदिर सभागृह, रांजणगाव (खुरी) ते बिडकीन सिमेंट रस्ता, बुरंगुळी नदीवरील पूल तसेच डॉ. आंबेडकर आदर्श शाळेच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. 

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य कृष्णा गिधाने, पंचायत समितीचे उपसभापती संजय लघाने, सरपंच सुरेश भिसे, अक्षय जायभाये, काकासाहेब टेके, पंचायत समिती सदस्य सतीश शेळके, अक्षय गवारे आदींसह अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.