खासदार भुमरेंकडून आणखी ३० लाखांच्या निधीची घोषणा
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर वैजापूर रोडवरील विठ्ठल आश्रम येथे ह.भ.प. रामभाऊ राऊत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या निमित्ताने खासदार संदिपान भुमरे व आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते नूतन सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले.
विठ्ठल आश्रमाच्या सभामंडपासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी खासदार निधीतून ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करत सभामंडपाचे काम मार्गी लागल्यानंतर आता आणखी ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा खासदार भुमरे यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना खासदार संदिपान भुमरे म्हणाले की, कोणत्याही धर्माच्या किंवा समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. समाजाच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलो आहोत. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, फ्फ अशी ग्वाही त्यांनी दिली. अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती होती.
धार्मिक कार्यक्रमासोबतच सभामंडपाच्या लोकार्पणामुळे विठ्ठल आश्रम परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी खासदार संदीपान भुमरे, आमदार बच्चू कडू, जिल्हा परिषद अध्यक्ष गलांडे पाटील, नगराध्यक्ष संजय जाधव, नगरसेविका सुवर्णा जाधव, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, वाल्मीक शिरसाट, नगरसेविका सवर्णा जाधव, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, लक्ष्मणसिंह राजपूत, नगरसेवक नवनाथ कानवडे, दीपक साळवे, प्रशांत सदाफळ, डॉ. उद्धव काळे, यांची उपस्थितीती होती.














