'खंडोबा-बानू विवाह सोहळ्या'च्या सजीव देखाव्याचे उद्घाटन

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): संभाजीपेठ येथील श्री ओम गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या 'खंडोबा-बानू विवाह सोहळ्या'च्या सजीव देखाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती तथा मंडळाचे मार्गदर्शक अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर गणरायाची आरतीही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
ओम गणेश मंडळाच्या वतीने यंदा 'खंडोबा-बानू विवाह सोहळा' या पौराणिक प्रसंगावर आकर्षक सजीव आधारित
देखावा साकारण्यात आला आहे. पारंपरिक पौराणिक कथानकाला सजीव स्वरूप देत हा देखावा उभारण्यात आला असून, भाविक आणि नागरिकांचे तो विशेष आकर्षण ठरत आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर बक्षी, उपाध्यक्ष प्रकाश कंठे, सचिव अजय परदेशी आणि कोषाध्यक्ष राजेश भोमा उपस्थित होते. तसेच मंडळाचे सदस्य समर्थ परदेशी, पवन मिठे, रोहित खडके, रक्षित
सिद्धिवाल, संदीप मिठे, दीपक झुंझारकर, शंकर सुरसे, संतोष श्रावगे, अमित भोमा, सागर सुरळे, स्वप्नील उपाध्ये, राजेंद्र सुपेकर, प्रणव गादे, आयुष गादे, यश सरदे आणि प्रकाश तांबोळी यांच्यासह परिसरातील गणेशभक्तांची उपस्थिती होती. हा सजीव देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी भेट द्यावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions