सिल्लोड, (प्रतिनिधी) 8 तालुक्यातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिवना जि. प. सर्कल मधील विविध गावात राबविण्यात आलेल्या जवळपास ७ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व मंजूर कामांचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार याच्या हस्ते झाले.
शिवना जि. प. सर्कल मधील जळकीबाजार, खुपटा, मादनी, नाटवी, शिवना, डीग्रस, पानवडोद खुर्द व बुद्रुक या गावांत विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, देविदास लोखंडे, राजूबाबा काळे, माजी जि. प. सदस्य मुरलीधर काळे, भिका वाघ, माजी सभापती विजय आबा दौड, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, कृउबा समितीचे उपसभापती संदीप राऊत, नानासाहेब रहाटे, शेख सलीम, विक्रम दौड, सय्यद नासेर हुसेन, सयाजीराव वाघ, राजाराम पाडळे, विठ्ठल जैस्वाल, प्रमोद दौड, प्रेम साळवे, ईश्वर
कालभिले, किशोर जगताप, सय्यद कैसर, विष्णू अपार, दत्तू दौड यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप फुलारी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकार्पण करण्यात आलेल्या कामांमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था, अंगणवाडी बांधकाम, समाज मंदिर, शादिखाना बांधकाम, गाव अंतर्गत पथदिवे रस्ते डांबरीकरण, अंतर्गत गटार व्यवस्था तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांचा समावेश आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येत असून,
सर्वसामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. लोकार्पण करण्यात आलेल्या विविध गावांमध्ये उपस्थित गावकरी व मान्यवरांनी विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.














