वाघोळा येथे इंडूरन्स कंपनीच्या माध्यमातून ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : तालुक्यातील बाघोळा गावाने ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत इंडूस्न्स कंपनीच्या उपक्रमातून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. सेवक ट्रस्टच्या सहकार्याने राबविण्यात येणान्या या उपक्रमामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार आहे.

काही दिवसापूर्वी वाधीळा येथे ग्रामसभेचे आयोजन करून गावाच्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या ग्रामसभेत ठरलेल्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. या विकासकामांचा शुभारंभ अनिवासी बाघोळा कर तसेच ज्येष्ठ सेवानिवृत कर्मचारी रावसाहेब येडूबा पाटील गायकवाड, शिवाजी आत्माराम पाटील गायकवाड आणि रामदास महाळणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विकास पाटील गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, आपण १७ वर्षांपासून सातत्याने वाघोळा ग्रामविकासासाठी प्रयत्न करत असताना इंदूरन्स कंपनीच्या माध्यमातून आणि सेवक ट्रस्टच्या सहकार्याने सुरू झालेला हा प्रकल्प आमच्या ग्रामविकास कार्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 

या उपक्रमामुळे वाघोळा गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून भविष्यात अनेक मूलभूत सुविधागावक-यांपर्यंत पोहोचतील. या प्रसंगी इंड्ररन्स कंपनीचे प्रतिनिधी उदय दुधगावकर, सुनील शिंदे तसेच गावकरी बाबुराव गायकवाड, संतोष गायकवाड, रामू गायकवाड, कचरू गायकवाड, श्रीमंत गायकवाड, संजय कावळे, भगवान गायकवाड, जनार्दन गायकवाड, सचिन फुलंब्री येथे इंडूरन्स कंपनीने उचललेले हे पाऊल ग्रामीण विकासासाठी आदर्श : इंडूरन्स कंपनीने माध्यमातून उचललेले हे पाऊल ग्रामीण विकासासाठी आदर्श ठरत असून, अशा उपक्रमांमुळे गावांचा शाश्वत विकास शक्य होत आहे. 

या पार्श्वभूमीवर विकास गायकवाड यांच्या वतीने अंतर्गत काम करणान्या विविध कंपन्या, संस्था आणि समाजहितैषी व्यक्तींना वाघोळा तसेच पोफळा येथे ग्रामविकासाची कामे हाती घेण्यासाठी आवाहन केले आहे. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन हातभार लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त कैली आहे. गायकवाड, रोहिदास थोरात, श्रीराम गायकवाड, पुंजाराम गायकवाड, अनिल गायकवाड, सोपान गायकवाड आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.