औरंगाबाद: महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात असलेल्या प्राणिसंग्रहालयात 26 एप्रिल रोजी समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. या वाघिण व पिल्लांची प्रकृती सुदृढ असून, समृद्धी वाघिणीच्या खाद्यकरिता देण्यात येणार्या मासा मध्ये 2 किलोने वाढ करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातच जन्माला आलेल्या सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघांच्या जोडीपासून चार बछडे जन्माला आली असून, यात दोन पिवळ्या त्यातील एक मादी व एक नर, दोन पांढर्या मादी आहेत. वाघिणीला अधिक दुध येण्याकरिता आहार वाढ करण्यात आली आहे. पूर्वी समृद्धी या वाघिणीला प्रति दिवस दहा किलो याप्रमाणे मासदेण्यात येत होते. यात आता दोन किलोने वाढ करून बारा किलो मांस प्रतिदिवस देण्यात येत आहे. वाघिणीला व बछड्यांना त्रास होऊ नये म्हणून वाघिणीच्या पिंजर्याजवळ केअर टेकर यांच्यशिवाय इतरांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. तसेच थंडावा मिळण्याकरिता कुलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिवसातून तीन वेळा समृद्धी वाघीण व चार बछड्यांची तपासणी केली जाते.