दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील निलजगाव येथे यश बहुद्देशीय शिक्षण संस्था संचालीत दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कूल निलजगावमध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश जैस्वाल, प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. 

ज्ञानेशवर मोगल, सोमीनाथ हुड, फिरोज कुरैशी इत्यादी यांच्या हस्ते भारतमाता, महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोमनाथ हुड यांच्या हस्ते ध्यजारोहण पर पडले. त्या नंतर विद्यार्थ्यांनी भाषणे, देश भक्ती पर गीते, नृत्ये, सादर करून उपस्थिताची मने जिंकली. 

मुख्याध्यापक मयूर स्वामी यांनी मनोगतमध्ये आजच्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सचिन साळवे, कल्पना साळवे, साजेदा पठाण, कलाबाई गायकवाड यांनी मेहनत घेतली.