पैठण शहरात स्वातंत्र्य दिन उत्साहात

Foto
पैठण, (प्रतिनिधी) भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध प्रतिष्ठानांमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

तहसील कार्यालय येथे तहसीलदार ज्योती पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्यसैनिक विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार यांची उपस्थिती होती.

नगरपरिषद पैठण येथे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, सर्व नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. शिवाजी नागरी सहकारी बँक येथे चेअरमन रवींद्र पाटील काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी अधिकारी कर्मचारी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शालिवाहन नागरी पतसंस्था येथे चेअरमन किशोर चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संचालक अधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. पंचायत समिती पैठण येथे सभापती वैशाली विनोद बोंबले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 याप्रसंगी अधिकारी कर्मचारी पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला. विद्याथ्यर्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेरी आणि देशभक्तीपर सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. अनेक ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 

शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत देशाप्रती असलेली आपली निष्ठा व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.