भारत रोखणार पाकिस्तानचे पाणी; तीन नद्यांचे पाणी सोडणार यमुना नदीत

Foto

 पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट आहे. विविध कूटनीतिक मार्ग अवलंबून भारत पाकिस्तानच्या मुसक्या आवळत आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून भारत भारतातून पाकिस्तानमध्ये वाहत जाणाऱ्या रावी, सतलज आणि व्यास नदीचे पाणी अडूवू शकतो अशी माहिती खुद्द केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

   बागपात येथे एका जाहीर कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांचे पाणी प्रकल्पाद्वारे अडवून यमुना नदीत सोडले जाईल. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाण्यासाठी वणवण होऊ शकते. 

     दरम्यान, काँग्रेसने पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्ला चढवला.   पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला चढवला तेव्हा मोदी हे फोटोशूट करण्यात मश्गुल होते असा आरोप काँग्रेसने मोदी यांच्यावर केला आहे. तसेच हल्ल्यानंतर मोदी यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे होते अशी टीका काँग्रेसने पतंप्रधान मोदींवर केली आहे.