मनपात पाणी अन् ड्रेनेजवरून राडा

Foto

महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळली; संपूर्ण ड्रेनेज योजनेचे ऑडिट करण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): पाणीटंचाई आणि ड्रेनेजवरून गुरुवारी महापालिकेची
सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. नवीन पाणीपुरवठा योजनेवर बोलू न दिल्याने संतप्त वंचितच्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या आसनाकडे धाव घेत जोरदार निदर्शने केली. सभागृहातील वाढता गोंधळ आणि आरडाओरडीमुळे महापौरांना अखेर घाईघाईत राष्ट्रगीत सुरू करून सभा तहकूब करावी लागली. दरम्यान, शहरात १५०० कोटी रुपये खर्च करूनही ड्रेनेजची समस्या कायम असल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या तीव्र विरोधाची दखल घेत महापौर समीर राजूरकर यांनी ड्रेनेज योजनेचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा गुरुवारी सुरू झाली. अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते. पाणीपुरवठा योजनेवर बोलू दिले जात नसल्याने वंचितचे नगरसेवक अमित भुईगळ आक्रमक झाले. कंत्राटदाराचे हैदराबाद-नागपूर कनेक्शन असल्याने त्याची पोलखोल होऊ नये म्हणून चर्चा रोखली जात आहे, असा आरोप भुईगळ यांनी केला. यावर महापौरांनी स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे योजनेवर सभागृहात चर्चा करता येत नाही. तक्रारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील
विष्णूनगरमध्ये दूषित पाण्याचा मुद्दा शिवसेनेचे (शिंदे गट) गटनेते किशोर नागरे यांनीही
प्रशासनावर संताप व्यक्त करीत घरचा आहेर दिला. छत्रपतीनगर भागात तर १३ दिवसांनी पाणी आले, मात्र ते पिण्यालायक तर नाहीच; पण धुण्या-भांड्यांसाठीही योग्य नसल्याची तक्रार त्यांनी केली. ऋषीकेश जैस्वाल, राजगौरव वानखडे आदींनी विष्णूनगर, भानुदासनगरमधील दूषित पाण्याचा मुद्दा उचलून धरला.
उच्चस्तरीय समितीकडे मांडाव्यात. यावरून महापौर आणि भुईगळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. भुईगळ आक्रमक होऊन महापौरांच्या आसनाकडे धावले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महापौरांनी तातडीने राष्ट्रगीत सुरू करून सभा संपवली. मात्र, राष्ट्रगीतानंतरही भुईगळ आसनासमोर उभे राहून उत्तराची मागणी करत होते. त्यानंतर इतर सदस्यांनी मध्यस्थी करत त्यांना बाजूला नेले.
भाजप-एमआयएम नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): एमआयएम नगरसेविकेच्या नातेवाइकाने अधिकाऱ्यांना धमकावल्याने हसूल कारागृह ते स्मृतिवन उद्यान या रस्त्यावरील विजेचे खांब हटविण्याचे काम मागील चार दिवसांपासून बंद असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. त्यावर विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पोल शिफ्टिंग करण्याच्या कामात नगरसेविकेचे नातेवाईक हस्तक्षेप करीत असल्याचे सभागृहात सांगितले. त्यावर नगरसेवकांनी तातडीने संबंधितांवर गुन्हा दाखल करून नगरसेविकेला अपात्र ठरवावे, अशी मागणी केली. मात्र कुणीही नगरसेवक नातेवाईकांना असे करायला सांगत नाही, त्यामुळे पक्षाचे नाव घेऊ नये, असे सांगत एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. एमआयएम आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
शहरातील रस्त्यावरील मधोमध असलेले विजेचे खांब हटविण्याच्या कामांच्या संदर्भात सभागृहात चर्चा सुरू असताना हा गोंधळ झाला. जिल्हा नियोजन समितीकडून २२ कोटी रुपये मिळाले असून, हा निधी एमएसईबीला सुपरव्हिजनच्या कामासाठी दिला आहे. त्यांच्या देखरेखीखाली शहरातील ९ रस्त्यांवर मधोमध असलेले विजेचे खांब हटविण्यात येत आहेत. यावेळी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी केलेल्या आरोपावर कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी, असा प्रकार झाल्याचे मान्य केले. त्यावर असे कुणी केले असेल तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेचे सभागृहाने अभिनंदन केले.