प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समर्थकांची घुसखोरी; राजकीय पक्षांचा ‘थर्ड आय’

Foto
 सोशल मीडिया चे महत्व राजकीय पक्षांना चांगलेच उमगले आहे. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी या नावाचे गारुड जनमानसावर रुजविण्यात सोशल मीडियाची मोठी भूमिका होती, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच सोशल मीडियाद्वारे होणारी टीकाटिप्पणी तसेच प्रचारावर राजकीय पक्षांचा ’वॉच’ आहे.

राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी जिल्ह्यातील प्रत्येक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये घुसखोरी करीत प्रत्येक घडामोडी नेत्याकडे पोहोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. निवडणूक आयोगाने सोशल मीडियाच्या वापरावर राजकीय पक्षांना अति शर्ती घालून दिल्या. त्यामुळे मीडियाचा वापर अत्यंत संयमाने आणि काळजीपूर्वक करण्याचा दबाव सर्वच राजकीय पक्ष तसेच उमेदवारांवर आहे. आपल्याकडून अथवा समर्थकाकडून कोणतीही चूक घडू नये, याची खबरदारी घेतली जातेय. त्याच बरोबर विरोधकांच्या चाली, छुपा प्रचार आणि अफवा यावर लक्ष ठेवण्यासाठी ’अत्याधुनिक मिडिया सेल’ तयार करण्यात आले. त्याद्वारे नव युवकांची फळी जिल्ह्यातील सर्व व्हॉट्सप ग्रुप फेसबुक, ट्विटर तसेच इतर माध्यमांवर बारीक लक्ष ठेवेल. आपल्यावरील टीकेला विरुद्ध प्रचाराला तातडीने उत्तर देण्याची जबाबदारी या मंडळींवर टीम वर आहे.