मासे विक्रीच्या वादातून हल्ला झालेल्या जखमी तरुणाचा घाटीत मृत्यू

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जुन्या बायजीपुरा भागातील कब्रस्तानासमोरील रस्त्यावर मासे विक्रीचे दुकान लावण्यावरून झालेल्या पूर्ववैमनस्यातून हॉकी स्टिकने हल्ला करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शहारूख शकील खान (वय ३०, रा. बायजीपुरा) या तरुणाचा सोमवारी रात्री १० वाजता घाटी रुग्णालयात न उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहारूखच्या मृत्यूची बातमी समजताच संतप्त नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरोधात आता थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-
६ जूनला रात्री कब्रस्तानासमोर ही घटना घडली होती. शहारूख खान याने या ठिकाणी मासे विक्रीचे
दुकान लावले होते. दुकान येथे का लावले, या कारणावरून अक्रम (रा. चिश्तिया कॉलनी) आणि माजेद (रा. किराडपुरा) यांनी शहारूखसोबत वाद घातला होता. शहारूखचे चुलते युसूफ खान आणि मित्र आकेब हे वाद सोडवत असताना, आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला. याच वेळी आरोपींनी शहारूखवर हॉकी स्टिकने वार केल्याने तो गंभीर जखमी होता. त्याच्यावर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली आहे. ज्या ठिकाणी शहारूख खानचे दुकान होते, तेथे आधीपासूनच आरोपींचे मासे विक्रीचे दुकान सुरु होते. त्यामुळे आरोपींनी शहारूखला त्या ठिकाणी दुकान लावण्यास तीव्र विरोध केला होता आणि त्यातूनच हा वाद उफाळून आला. दरम्यान, शहारूखच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या नातेवाइकांनी आणि परिसरातील नागरिकांनी घाटी रुग्णालयात मोठी गर्दी केली. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions