मेंढी येथील घरफोडीतील सराईत आरोपी अटकेत

Foto
सोन्याचे दागिने घेतले ताब्यात, गुन्हे शाखेची कारवाई

गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील मेंढी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत चोरीस गेलेल्या सोन्या-दागिन्यांचा हस्तगत केला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी मुद्देमाल केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

घटनेची माहिती फिर्यादी आदिनाथ तुळशीराम औताडे (वय ३०. रा. मेंढी) यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराचे कुलूप तोडून दोन अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-दागिन्यांसह एकूण ३,५६,००० किंमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.

यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. विनायकुमार मे. राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत तपास करीत होते. अंतापूर (ता. गंगापूर) येथील संशयित स्वरूप संतोष उर्फ हरी काळे हा चोरी केलेला माल विक्रीसाठी गंगापुरात येत आहे. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगापुर भेंडाळा रोडवरील नगरपरिषदेच्या नव्या वॉटर फिल्टर प्रकल्पाजवळ सापळा लावला. 

त्यात आरोपी स्वरूप काळे (वय २५) याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त चौकशी दरम्यान आरोपीने साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिली. पंचासमक्ष अंगझडती दरम्यान सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला मुद्देमालासह गंगापुर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले असून, पुढीलतपास पोलीस स्टेशन गंगापूरमार्फत सुरू आहे. कारवाईत सहभागी अधिकारी-कर्मचारी या कारवाईत पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पो. उपनिरीक्षक महेश घुगे, पोह. कासीम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, पो. अं. बलविरसिंग बहुरे, शिवाजी मगर आदिंनी कामगिरी केली.