इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालय राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत तृतीय

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) कॉलेज, कन्नड राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत तृतीय आले.

पॉलिटेक्निक महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या तृतीय वर्षातील ओमप्रसाद दाबके, कृष्णा पाटील, समीक्षा कचोळे, चंचल पवार या विद्यार्थ्यांनी पीइएस पॉलिटेक्निक महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत स्मार्ट हेल्मेट हा प्रकल्प सादर करत तृतीय क्रमांक मिळविला. 

स्मार्ट हेल्मेट हे असे बनविले की, जोपर्यंत चालक हेल्मेट घालणार नाही तोपर्यंत गाडी स्टार्ट होणार नाही. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात रस्ते सुरक्षिततेसाठी विविध नवे उपाय शोधले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्मार्ट हेल्मेट हा अभिनव प्रकल्प विकसित केला. 

या हेल्मेटमध्ये अल्कोहोल डिटेक्शन सेन्सर, जीपीएस आणि जीएसएम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्ट हेल्मेटमुळे दारू पिऊन वाहन चालवण्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हेल्मेटमध्ये बसवलेला अल्कोहोल सेन्सर रायडरच्या श्वासातून दारूचे प्रमाण तपासतो. जर दारूचे प्रमाण जास्त आढळले तर वाहन सुरू होणार नाही. त्यामुळे अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होईल. या हेल्मेटमध्ये जीपीएस आणि जीएसएम मॉड्यूलचा समावेश करण्यात आला आहे. जर दुचाकीस्वाराचा अपघात झाला तर हेल्मेटमधील सेन्सर त्याची नोंद घेतो आणि जीपीएसच्या मदतीने अचूक स्थान शोधले जाते. 

जीएसएम तंत्रज्ञानाद्वारे कुटुंबीयांना किंवा आपत्कालीन सेवांना त्वरित संदेश पाठवला जातो. या प्रकल्पामुळे रस्ते सुरक्षिततेत सुधारणा होऊ शकते. तरुणांमध्ये हेल्मेट वापरण्याची सवय वाढेल आणि अपघात झाल्यास त्वरित मदत मिळण्यास मदत होईल. त्यामुळे स्मार्ट हेल्मेट हा प्रकल्प भविष्यातील सुरक्षित वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

याासाठी विद्यार्थ्यांना प्रा. तेजस दापके व प्रा. शीतल यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष किशोर पाटील, सरचिटणीस प्रसन्ना पाटील, संचालक विश्वास मोतिंगे, डॉ. अजित चौधरी, संतोष मतसागर, प्रा. प्रमोद गडपायले, प्रा. श्रीराम काळे, प्रा. गोपाल दाभाडे, प्रा. आशिष गावंडे, प्रा. महेंद्र राजपूत, प्रा. इक्रम पठाण आदींनी अभिनंदन केले.