शहरातून ३० लाखांची बॅग पळवणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Foto

औरंगाबाद- शहरातील एपीआय कॉर्नर येथील भारत बाजार जवळून गाडीची काच फोडून मनोज बाजीराव गटकाळ या व्यापाऱ्याची ३० लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविली होती. महिन्याभरानंतर रविवारी पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून ५ लाख रुपये रोख, १० मोबाईल, १ कार, विविध बँकांचे पासबुक आणि एटीएम असा एकूण १२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही टोळी दुसऱ्या राज्यातील असून विजय रामेश्वर राणा (वय २३, रा.ठाणे), पुष्पा सॅम्युअल परेरा (ठाणे) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिंसाकडून या टोळीतील साथीदारांचा शोध सुरु आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उप-आयुक्त डॉ.दिपाली घाटगे, सहाय्यक पोलिस आयुकत डॉ.नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक मधुकर सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने केली.