सिल्लोड, (प्रतिनिधी) भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांची वेशभूषा करत आम्ही महिला अबला राहिलो नसून सर्वच क्षेत्रात कार्यरत राहून आम्ही सबला झालो, असल्याचा देखावा तयार केला.
महिला शिक्षणासाठी महिला सक्षमीकरणासाठी ज्या महामातांनी योगदान दिले, प्राणाची आहुती दिली त्यांच्या कार्यास उजाळा देत जय जयकार करण्यात आला. संध्या खांदवे, प्रांजल आग्रे, आदिरा मुठे, रोशनी निंबाळकर, तेजल दुतोंडे, ऋतुजा काकडे, भक्ती जधाव, सान्वी चिकटे, आराध्य भिवसने, दिव्या पांडव, प्रणिती चाथे, राजकन्या भिवसने, दीपिका भोसले, यशवंती काकडे आदी विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.













