गुजराती विद्या मंदिरात जागतिक योग दिन

Foto
संभाजीनगर छत्रपती (सांजवार्ता ब्युरो): जागतिक योग दिनानिमित्त गुजराती विद्यामंदिर व जीओ और जीवन दो योग साधना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अनिल मकरिये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल मकरिये म्हणाले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी लहान वयापासून योगाची सवय लावल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. योगामुळे सकारात्मक
जागतिक योग दिनानिमित्त गुजराती विद्यामंदिर शाळेत मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत योग कार्यक्रम पार पडला. या वेळी शिक्षक व विद्यार्थी.
विचार, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैलीचा पाया मजबूत होतो. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राजेश मेहता, मुख्याध्यापिका कल्याणकर, नगरसेविक विजयसिंग झाला, योग प्रशिक्षक भाऊ सुरडकर, वैभव जाधव, ललित कासार, अरुण थोरात, दिलीप तोडे तसेच शाळेतील शिक्षकवृंद व
विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले. कार्यक्रमातून निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यासाचा संदेश देण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions