जि. प. पंचायत समितीसाठी मुलाखती उत्साहात

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (शिंदे गट) कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखती सिल्लोड, सोयगाव येथे आमदार अब्दुल सत्तार तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. 

शिवसेना पदाधिकारी केशवराव पा. तायडे, प्रभाकर काळे, धरमसिंग चव्हाण, गोपीचंद जाधव, अर्जुन गाढे, विश्वास दाभाडे, नंदकिशोर सहारे, सुदर्शन अग्रवाल, दुर्गाबाई पवार यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला. आज दिवसभर सिल्लोड व सोयगाव शहरातील शिवसेना भवन कार्यालयात हे मॅरेथॉन मुलाखत सत्र सुरू होते. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या मुलाखती दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहिल्या. सिल्लोड तालुक्यातील एकूण ९ व सोयगाव तालुक्यातील मतदारसंघात येणाऱ्या २ अशा ११ जि. प. गटासाठी जवळपास ५५ तर त्याअंतर्गत येणाऱ्या २२ पंचायत समितीच्या गणासाठी तब्बल ११० पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

 शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी घोषित केलेले आहे. दोन्ही तालुक्यात जवळपास १६५ इतक्या इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केला. त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती दरम्यान प्रत्येक उमेदवाराची प्रतिमा, सामाजिक कामातील सहभाग, गट व गणात येणाऱ्या गावांची माहिती, मागील कामगिरीचा आढावा, स्थानिक जनसंपर्क, सामाजिक गणिते तसेच इच्छुक उमेदवार जास्त आहेत,

 सर्वांचा सखोल अभ्यास विचार करून याबाबत योग्य निर्णय पक्ष पदाधिकारी घेतील असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. जो उमेदवार पक्षाकडून दिल्या जाईल त्या उमेदवारामागे सर्वांनी एकदिलाने खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पक्षनिष्ठा या मुद्द्यांवर सखोल चर्चा करून माहीती घेण्यात आली. उमेदवारांची जनाधारक्षमता आणि कार्यकत्यांशी असलेले संबंध हे सुद्धा या मुलाखतीत महत्त्वाचे निकष मानले जात आहे.