वॉश्गिंटन : इराण युद्ध आणखी किती दिवस चालणार? यासंदर्भात खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. हा संघर्ष आणखी चार आठवडे सुरू राहू शकतो, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहे. तसेच, इराण हा एक मोठा आणि मजबूत देश आहे. यामुळे या प्रक्रियेला वेळ लागणे स्वाभाविक आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
द डेली मेलला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, ङ्गङ्घहे आधीपासूनच चार आठवड्यांचे नियोजन होते. आम्हाला वाटते की यासाठी चार आठवडे किंवा त्यापेक्षा थोडा कमी वेळ लागेल. सर्व काही नियोजनानुसारच सुरू आहे. अमेरिकेने इराणची संपूर्ण लीडरशिप संपवली आहे.ङ्घङ्घ एवढेच नाही तर, या कारवाईत इराणचे सुमारे 48 नेते मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला.
सैनिकांना श्रद्धांजली
इराण युद्दात तीन अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, ते जवान जबरदस्त होते. मात्र, अशा घटना घडू शकतात याची आम्हाला भीती होती. यावेळी त्यांनी शहीद सैनिकांना श्रद्धांजलीही अर्पण केली. तसेच, आपल्या कार्यकाळातील हे पहिले अमेरिकन मृत्यू असल्याचेही ते म्हणाले.
चर्चेचा मार्गही खुला
यावेळी, इराणसोबत चर्चा होऊ शकते? असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, माहीत नाही, इराणला चर्चा करायची आहे, पण मी त्यांना सांगितले की, चर्चा गेल्या आठवड्यात करायची होती. या आठवड्यात नाही. दरम्यान, ट्रम्प यांनी बहरीन, सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि जॉर्डनच्या नेत्यांशी संवाद साधला असून, लवकरच ते अमेरिकन जनतेला संबोधित करणार आहेत.
इस्रायलने इराणच्या दाट लोकवस्तीवर ६ मिसाइल डागल्या
अमेरिका इस्रायलने इराणविरोधात आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्रायलने इराणी शहर सानंदजवर हल्ला केला. शहरातील दाट लोकवस्तीत इस्रायलने ६ मिसाइल डागल्या आहेत. त्यात पोलीस स्टेशनसह रहिवासी इमारतीही उद्ध्वस्त झाल्या. इस्रायलने लेबनॉनवरही हल्ला केला. या हल्ल्यात ३१ लोक मारले गेले तर १४९ जण जखमी झालेत.
अमेरिकेचे F-15 विमान इराणने पाडले?
इराणने अमेरिकेचे एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. इराणी मीडिया आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये एफ-१५ जेट खाली सरकताना दिसत आहे. या विमानाच्या मागच्या बाजूस आग लागल्याचे दिसते. स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
चर्चेतून तोडगा काढला जावा, मोदींनी केले आवाहन
मध्य पूर्वेतील युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचं आवाहन केले आहे. परिस्थिती चिंताजनक असून सध्याचे संकट केवळ संवाद आणि राजनैतिक प्रयत्नांद्वारेच सोडवता येईल. दुसरा कोणताही मार्ग नाही. भारत शांतता, स्थैर्यासाठी काम करतेय आणि भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. भारत सर्व देशांसोबत काम करेल. भारत सर्व वाद चर्चा आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्यास पाठिंबा देतो असं मोदींनी म्हटलं आहे.