औरंगाबाद: उत्तर भारतात घडणारे मॉब लिंचिंगच्या प्रकाराचे लोण आता औरंगाबाद शहरताही पसरल्याचे दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी एका मुस्लिम युवकाला जय श्रीरामाच्या घोषणा दयायला लावून मारहाण झाल्याची घटना हडको कॉर्नर येथे घडली होती. यांनतर रविवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान शहरातील आझाद चौकात एका झोमॅटो कामगाराला जय श्रीरामाची घोषणा देण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ज्या व्यक्तीला ही धमकी देण्यात आली ती झोमॅटोचा कामगार असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद चौकाजवळ ही घटना घडली असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले. याविषयी आम्ही स्टेटमेंट घेऊन एफआयआर दाखल करणार आहोत. त्यांना थांबवून नारा देण्याससांगण्यात आले. या लोकांवर कारवाई करण्यात येईल. लोकांनी शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या येथील वातावरण नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.