११ ते १९ एप्रिल दरम्यान जयभीम फेस्टिव्हल उत्साहात सुरु

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व नगर परिषदेच्या वतीने ११ ते १९ एप्रिलदरम्यान जयभीम फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. हा फेस्टीव्हल सुरु झाले आहे. या समितीच्या वतीने विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात व विविध प्रश्नांवर आंदोलने करणाऱ्या चंद्रसेना शेजवळ यांना त्यागमूर्ती माता रमाई गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संविधाननिष्ठ आदर्श प्रशासक गौख पुरस्कार मुद्रांक जिल्हाधिकारी गोरख सातदिवे, महासूर्य डॉ. आंबेडकर ऊर्जा गौरव पुरस्कार इंजि. श्याम मोरे, महासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाव्रती पुरस्कार माणिक पगारे (सेवा निवृत्त ग्रामविकास अधिकारी), आदर्श धम्मदायक पुरस्कार टी. पी. पवार (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) सांडू घायतिलक (सामाजिक कार्यकर्ता), प्रज्ञावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन गौरव पुरस्कार विवेकानंद सुकाळे (लेखन प्रबोधन), पोलिस दलातील सुकेशिनी कांबळे यांच्यासह कला, चित्रकला, छायाचित्रण, नाठ्य अभियन, गीतलेखन, शैक्षणिक, कायदा, पत्रकारिता, उद्योग व व्यवसाय पोलिस प्रशासन, शेती आणि वैद्यकीय या क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुरस्कार्थीना १४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्याम मुंडे, प्रा. प्रतिभा अहिरे, नगराध्यक्ष शेख फरीन बेगम, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पदाधिकारी यांच्या हस्ते मानपत्र, संविधान उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.