'जैश ए मोहंमद'चा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू

Foto

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहरचा मृत्यू झाला असल्याची बातमी आहे. या वृत्ताला पाकिस्तानकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नसला तरी मसूद अजहराचा २ मार्च रोजी मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. 

    पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान मधील बालकोट येथे केलेल्या एयर स्ट्राईकमध्येच तो मारला गेला असल्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर होणारी नाचक्की टाळण्यासाठी पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी तो आजारी असल्याचे सांगितले होते. यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी येत आहे. पाकिस्तान लष्कराने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी लवकराच तशी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.