आ.सत्तार यांचे समर्थक जितसिंग करकोटक यांनी शहराध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

Foto
 
पैठण :  कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा आ.अब्दुल सत्तार यांचे समर्थक जितसिंग करकोटक यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या कडे पाठविला असून, यापुढे आपण पक्षाचे काम करणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पुढे बोलताना जितसिंग करकोटक म्हणाले की गेल्या 15 वर्षांपासून मी काँग्रेस कमिटी चा शहर अध्यक्ष म्हणून काम पहात आहे पक्ष वाढवण्यासाठी आपण जीवाचे रान केले आहे. मी पैठण नगरपरिषदेचा तीन वेळेस नगरसेवक व दोन वेळेस नगराध्यक्ष राहिलो आहे.  पैठण शहर अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी आपण तन-मन-धनाने कार्य केले आहे.  मात्र आमचे नेते आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर पक्षाने अन्याय केला आहे.  त्यामुळे आपण शहराध्यक्ष पदावर काम करू शकत नाही सध्या तरी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी सांगितले कार्यकर्त्यांनी कुठे जावे व कोणाचे काम करावे या बाबतीत त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जितसिंग करकोटक यांनीनी राजीनामा दिला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान तालुक्यातील अनेक आमदार सत्तार समर्थक हे सुद्धा आपल्या पदांचे राजीनामे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.