छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सुरेश बहुरे यांनी केले आहे.
मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील टोयोटा किर्लोसकर मोटर, परकिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कॉस्मो फिल्म्स प्रा. लि., औरंगाबाद अॅटो अॅसिलरी, संजीव अॅटो पाटऱ्स मॅन्यूफॅक्चरिंग लिमिटेड, रूचा इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, साई सुप्रिम इक्वीपमेंट, चिकलठाणा, वार्नर इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शेंद्रा, क्लॅड मेटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सल, रूचा इंजिनियरिंग, बागला गृप, अलंकार इंजिनिअरींग ईक्युपमेंट प्रा. लि. शेंद्रा, एस एस कंट्रोल प्रा.लि., इंडूरन्स टेक्नोलॉजी लि., निपूण स्कील्स, मल्टीसर्व्हिसेस, एआरएमएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेडिरिक्रूटर्स - पॅन इंडिया, लाईफ इंश्यूरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, धूत अॅटोमोटिव सिस्टीम प्रा. लि., रिझल्ट सिएक्स प्रा. लि., युनिकेअर हेल्थ केअर प्रा. लि., क्वेस क्रॉप प्रा. लि., श्री गणेश प्रेस प्रा. लि., शॉपर्स स्टॉप प्रा. लि., समर्थ इलेक्ट्रोकेअर प्रा. लि., अजिंक्य ग्रूप ऑफ बिझनेस, पंचशिल बिल्डकॉइन, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, हम्मा फूड़स प्रायव्हेट लिमिटेड, पीएमएम परिहारमिलन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, कैझन प्लास्टोमोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डॉ. रेड्डी फाउंडेशन, व्हीज्युअल इंन्फोसिस्टीम प्रा.लि., एक्सीडी इंडिया प्रा. लि., बुश इलेक्ट्रोमेक अॅड इंजिनिअरींग प्रा.लि., नाथ फॉईल्स प्रा.लि., नेटलॅप ईट ट्रेनींग अॅड सोलूशन अशा नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.
या विविध ३७ आस्थापनांकडून २५३३ रिक्तपदे प्राप्त झालेली असून ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरिंग, डिप्लोमा, आयटीआय, एचएससी, एसएससी उतीर्ण आदी पात्रताधारक युवक युवतींसाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.














