एकत्रित कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद : नरेंद्राचार्य महाराज

Foto
चौका येथे आज करणार समारोप

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : भारत देश भविष्यात जगाचा विश्वगुरू म्हणून उभा राहत आहे. त्यामागे भारतीय संस्कार, अध्यात्म आणि एकत्रित कुटुंब व्यवस्था हीच सर्वांत मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. चौका येथे भक्तगणांच्या वतीने १४ व १५ मार्च रोजी दोन दिवसीय मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. 

या सोहळ्याच्या निमित्ताने शनिवारी साधक दीक्षा हा उपक्रम झाला. यावेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज म्हणाले, देवाची प्राप्ती करायचो असेल तर दीनदुबळ्या आणि गरजू समाजाची सेवा करा. तेव्हाच खन्य अथनि ईश्वरप्राप्ती होते. समाजातील अंधश्रद्धा आणि कालबाह्य परंपरा दूर करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भात मुलीचा धर्म बदलला जाऊ नये, आणि भविष्यातील मुलांचा धर्म आईच्या धर्मावरूनच मानला जावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

-- नाणिज संस्थानचा सामाजिक उपक्रमांवर देणार भर --- 
महाराष्ट्रभर जगदुरू रामानंदाचार्यजी नरेंद्र महाराज संस्थान नाणिज यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा निःशुल्क पुरविण्यात येत आहे. सुमारे पावणे दोन लाख पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे वाटप केले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात मोफत रुग्णवाहिका सेवादेखील मुख्य महामार्गावर संस्थानच्या माध्यमातून निःशुल्क दिली जात आहे.