पेपरफुटीवरून ठाकरे गट, काँग्रेस आणि एसएफआयचे संयुक्त आंदोलन पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट

Foto
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एसएफआयकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. शहरातील उस्मानपुरा भागातील आरसीसी मोटेगावकर क्लासेससमोर या तिन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली.
संतप्त कार्यकर्त्यांनी क्लासेसच्या मुख्य बॅनरची तोडफोड केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र संतप्त कार्यकर्त्यांना रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी काँग्रेसच्या दीक्षा पवार, ठाकरे गटाच्या दिपाली पाटील, एसएफआयच्या मनीषा बल्लाळ आणि अरुण मते यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीस मिळवणाऱ्या अशा शैक्षणिक संस्थांना शहरात पाय रोवू देणार नाही. जर यापुढे हे क्लासेस सुरू राहिले, तर यापेक्षाही तीव्र आणि जशास तसे उत्तर देणारे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाविकास आघाडी आणि डाव्या संघटनांच्या नेत्यांनी यावेळी दिला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions