वैजापूर, (प्रतिनिधी) : शहरालगतच्या जुना - नागपूर- मुंबई महामार्गावरील घनश्री हॉटेलमध्ये सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर वैजापूर पोलिसांनी सोमवारी (ता. १७) मध्यरात्री छापा टाकला. पोलिस पथक शहरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तब्बल १७ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २० हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हॉटेल चालक यश गायकवाडसह - नीतेश कन्हाळे (रा. टाकळीसागज), गणेश राजपूत (रा. फुलेवाडी रोड), आशुतोष बोडखे (रा. पाटील गल्ली), विश्वनाथ धामे (रा. कुंभार गल्ली), प्रथमेश उचित (रा. टिळक रोड), हंसराज जगताप (रा. बल्लाळीसागज), रवींद्र रोरे (रा. सिरेगाव), करण जाधव, पुष्पक जाधव (दोघे रा. सटाणा), कुणाल राजपूत, हर्षद राजपूत (दोघे रा. परदेशी गल्ली), सूरज महेर (रा. शास्त्रीनगर), सुनील पेहरकर, करण राजपूत आणि आकाश पेहरकर (तिघे रा. रामवाडी) आणि अन्य एक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.














