छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वैजापूर तालुक्यातील अपघात प्रकरणात मोटार अपघात न्यायाधिकरणाने मृत अभियंत्याच्या वारसांना १६ लाख ७७ हजारांची भरपाई ७ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला आहे.
दि. ३१ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी योगेश सुभाष हिरे हे दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरहून निमगावकडे जात असताना एका भरधाव टँकरने
त्यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात चालक बापू पडवळ यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. मयत योगेश हिरे यांच्या आई व बहिणीने मोटार अपघात न्यायाधिकरण, वैजापूर येथे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. अर्जदारांच्या वतीने अॅड. संदीप बी. राजेभोसले यांनी युक्तिवाद करताना अपघातास चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत
असल्याचे स्पष्ट केले. तसेच मयत योगेश हिरे हे औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असून कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व पुरावे विचारात घेऊन न्यायाधिकरणाच्या सदस्या मा. एस. के. उपाध्याय यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले. या प्रकरणात अॅड. अंकीत मालपाणी, प्रशांत गायकवाड, अर्जुन इंगळे व आकाश राठोड यांनी सहकार्य केले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions










