कन्नड, (प्रतिनिधी) : उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने हिवरखेडा गौताळा येथे अवैध गौण खनिज उत्खननावर धडक कारवाई केली. ही कारवाई बुधवार, ७ रोजी रात्री साडेदहा वाजता करण्यात आली.
तालुक्यातील हिवरखेडा गौताळा येथील गट नंबर ६९ मधील जमिनीत काही अज्ञात व्यक्तींकडून पोकलेन व हायवा वाहनांच्या साहाय्याने अवैध उत्खनन सुरू असल्याची
प्राथमिक माहिती मिळाली होती. जमिनीचे मालक गोरखनाथ तुकाराम काळे (रा. हिवरखेडा गौताळा) तसेच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी फोनद्वारे तक्रार दिल्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जायमोक्यावर तपासणी केली असता दोन हायवा व एक पोकलेन अवैध गौण खनिज वाहतूक करताना आढळून आले.
यावेळी पोलीस विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. कारवाईदरम्यान एक
पोकलेन तसेच हायवा (एम १९ सीवाय ४२४२) आणि (एमएच १९ सीवाय १७१७) जप्त करण्यात आले. जप्त केलेले पोकलेन व हायवा संबंधित गावांचे ग्राम महसूल अधिकारी सुनील राठोड यांच्या ताब्यात
देण्यात आले असून, तात्पुरत्या स्वरूपात जवळील शेतकऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत.
जप्त हायवा पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहेत. या कारवाईत उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी करण जारवाल, कुणाल दाभाडे, अभिजित पानट, सुरक्षारक्षक मेजर व्यवहारे, ग्राम महसूल अधिकारी सुनील राठोड व दीपक एरंडे, तसेच पोलीस विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पठाण व इतर कर्मचारी उपस्थित होते. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ही संपूर्ण कारवाई उपविभागीय अधिकारी संतोष गोरड अपराजिता अग्निहोत्री यांच्या पथकाच्या सहकायनि यशस्वीरीत्या पार पडली.















