कन्नड, (प्रतिनिधी): कन्नड नगरपालिकेचा २०२६ २७ या वर्षाचा अर्थसंकल्प गुरूवारी (दि.२६) सादर करण्यात आला. उपनगराध्यक्षा रंजना राठोड, नगरसेविका वर्षा ताठे, विद्या काशिनंद यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी प्रखर विरोध करुनही पिठासिन अधिकारी तथा नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी या अर्थसंकल्पास मंजुरी दिली.
यंदा पाच लाख ३० हजार ६७० रूपयांचा शिलकीचा अर्थ संकल्प सादर केला. अंदाजपत्रकीय जमा, महसूली आणि लेखा शिर्षकाखाली ८२ कोटी रुपये जमा होतील. या वर्षात जनगणना होणार आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच दिव्यांग कल्याण महिला व बालविकासासाठी पाच लाख रुपये, बांधकाम व दुरुस्तीसाठी दोन कोटी, शहरात भूयारी गटार तयार करण्यासाठी चार कोटी, गिरणी ग्राउंडवर नऊ हजार स्केअवर फूट जागेत नमो उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी निधी मंजूर करण्यात आला.
कमीत कमी २२ टक्के कर आकारणी अनोंदणीकृत मालमत्तेला आकारण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भाग्यश्री बेडगे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी विवेचन केले. या दरम्यान अंदाजपत्रक सादर करण्याच्या आधी लेखापाल निलेश शिंदे, उपनगराध्यक्षा रंजना राठोड, स्वीकृत नगरसेवक संतोष कोल्हे यांनी आरोप केला. नगराध्यक्ष फरीन बेगम व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी जुन्या कायद्याचा वापर करून जुनी कर प्रणाली लागू करणे, ही सभागृहाची दिशाभूल असल्याचे ते म्हणाले.
66 अर्थसंकल्प २०१३ व्या सुधारित कायद्यानुसार मांडला. नगरपालिका इतिवृत लिहिताना चूक झाली. यापूर्वीच्या समितीनेच ब दर्जाच्या पालिकेसाठी अनोंदणीकृत मालमत्तेला लागू असलेला २२ टक्के कर आकारणीचा निर्णय घेतला आहे. ११ वर्षांपूर्वी सादर झालेला महाराष्ट्र लेखासंहिता १९७१ वापरून हा अर्थसंकल्प तयार केल्याचे ते म्हणाले.
उपनगराध्यक्ष व इतर सदस्यांनी अर्थसंकल्प दिला. त्यांचा विरोधासाठी विरोध सुरू आहे. अर्थसंकल्पावरबुकलेट स्विकारण्यास नकार नगराध्यक्ष, कन्नड फरीन बेगम अब्दुल जावेद, नगराध्यक्षा फरीन बेगम यांनी अर्थसंकल्प मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. अर्थसंकल्पात सुधारणा व चर्चा होऊ शकते. शहराचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
- खींद्र लांडे, मुख्याधिकारी, कन्नड.












