गोविंदा... व्यंकटरमणा गोविंदाच्या जयघोषाने कर्णपुरा दुमदुमले...

Foto

कर्णपुऱ्यात भाविकांची तुडुंब गर्दी; रथयात्रेचे घेतले दर्शन
(छाया : सचिन भंडारे)
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गोविंदा... गोविंदा... व्यंकटरमणा गोविंदाचा जयघोष, ढोल
ताशांचा गजर, बँड पथकाच्या गजरात कर्णपुरा परिसरात बालाजी मंदिरातून रथयात्रा काढण्यात आली. यावेळी
भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली. विजयादशमीनिमित्ताने बालाजी भगवंतांचा पारंपरिक
पारंपरिक सोहळा
कर्णपुरा येथील बालाजी मंदिरात विजयादशमीचा उत्सव गेल्या दीडशे ते दोनशे वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही बालाजी मंदिर ट्रस्ट आणि कुमावत समाजाच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. रथयात्रेपूर्वी मान्यवरांच्या हस्ते बालाजी भगवंतांची आरती करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी दोरखंडाच्या साहाय्याने पारंपरिक रथ ओढण्यास सुरुवात केली. रथ पुढे सरकताच उपस्थित भाविकांनी गोविंदा... गोविंदा... व्यंकटरमणा गोविंदाचा जयघोष केला. गोविंदा... गोविंदा... च्या जयघोषामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक रथ ओढण्याच्या सोहळ्यात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पावसासाठी घातले साकडे
दसऱ्यानिमित्ताने कर्णपुरा येथील मातामंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. कर्णपुरा मातामंदिरात भाविकांनी लांबच लांब रांगा लावून दर्शन घेतले. यावेळी आई जगदंबे असा जयघोष केला. यावेळी भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन जनकल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी अनेकांनी चांगला पाऊस पडू दे, दुष्काळी परिस्थिती दूर होऊ दे अशी प्रार्थना केली. दसऱ्याच्या निमित्ताने कर्णपुरात यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने शहरवासीयांना गर्दी केली.
रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कर्णपुरा येथील बालाजी मंदिरातून सायंकाळी रथयात्रा
काढण्यात आली. यंदा आली. दुष्काळाचे सावट असल्याने कर्णपुरा येथील रथाची सजावट साधेपणाने करण्यात
मात्र, सजावटीतील साधेपणापेक्षा भक्तीचा उत्साह अधिक दिसून आला.