'हर हर महादेव'च्या जयघोषात श्रावणी सोमवारी कावड यात्रा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पवित्र श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शिवशंभो प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. पर जाधववाडी येथील रामेश्वर महादेव त मंदिरापासून निघालेल्या या यात्रेत की हजारो भाविक मोठ्या उत्साहाने या सहभागी झाले होते. 'हर हर न महादेव' आणि 'जय शिवराय'च्या मेरे जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय ब्ल झाला होता. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी क्रेनच्या साहाय्याने कावड व भाविकांवर भरभरून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केले.
माजी आमदार संजय केणेकर हे यात्रेचे संयोजक होते, तर
सरला बेटाचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. रामेश्वर महादेव मंदिरात पूजा झाल्यानंतर कावड यात्रेला प्रारंभ झाला.
यात्रेत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रामेश्वर
प्रतिष्ठाण छ. संभो
महादेव मंदिरातून निघालेली यात्रा टीव्ही सेंटर चौक, गणेश कॉलनी, पंचायत समिती, चांदणी चौक, चेलीपुरा, शहागंज, महात्मा गांधी पुतळा, सिटी चौक पोलिस ठाणे, गुलमंडी, संभाजी पेठ आणि महात्मा फुले चौक मार्गे खडकेश्वर
महादेव मंदिर येथे पोहोचली. ठिकठिकाणी स्वागताचे फलक, पुष्पवृष्टी आणि धार्मिक घोषणांमुळे वातावरण भारावून गेले होते. भाविक महादेवाच्या भक्तीत तल्लीन होऊन यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेच्या मार्गावर गर्दी वाढल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
मात्र, पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. भक्ती, उत्साह आणि धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या यात्रेमुळे शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. यशस्वी आयोजनासाठी सागर भारस्कर यांनी पुढाकार घेतला.