आगामी निवडणूका समोर ठेवून युवकांचे - मजबूत संघटन करा : आ. अब्दुल सत्तार
सिल्लोड, (प्रतिनिधी) _: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक समोर ठेवून युवकांचे - मजबूत संघटन करा, मजबूत बूथ यंत्रणा उभी करा, महिलांचे संघटन करा, वाडी वस्त्यांवर जावून संपर्क वाढवा, मतदार याद्या तपासा, कुठल्याही बुथ वर दगा फटका बसणार नाही याची दक्षता घ्या.
जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करीत आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ मुख्यनेते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात
आम्ही सर्वच जागा लढू, प्रत्येक जागेवर विजय मिळवू असा विश्वास आमदार सत्तार यांनी व्यक्त केला.
रविवारी शिवसेना भवनात आमदार सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाचा प्रचार नारळाचा शुभारंभ केला. तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे यांचा सत्कार पार पडला. आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभकरण्यात आला.
जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, किशोर अग्रवाल, देविदास लोखंडे, श्रीराम महाजन, सुदर्शन अग्रवाल, देविदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, रामदास पालोदकर, मनोज झंवर, धरमसिंग चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई गव्हाणे, उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, माजी नगराध्यक्षा राजश्री
निकम, धुपताबाई सोनवणे, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शाह, डॉ. संजय जामकर, मनोज झंवर, संदीप राऊत, दारासिंग चव्हाण, श्रीरंग पाटील साळवे, जयराम चिंचपुरे, सतीश ताठे, अजित सेठ बागवान, भाऊराव लोखंडे, रमेश लाठी, दामू अण्णा गव्हाणे, नानासाहेब रहाटे, रउफ बागवान, विनोद मंडलेचा, वकील वसईकर, प्रताप प्रसाद, अक्षय मगर, प्यारेलाल जयस्वाल, राजेंद्र ठोंबरे, हनिफ मुलतानी, संजय डमाळे, राजाराम पाडळे, कृष्णा पालोदकर, प्रशांत क्षीरसागर, गिरीश शाह, नासिर हुसेन, सखाराम अहिरे, राजेश पालोदे, जगदीश बेदवे, कौतिकराव मोरे, आदीसह विविध गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.















