खडसे आज घेणार शरद पवारांची भेट?

Foto
 भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. लवकरच मोठा निर्णय घेऊ असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही झाल्याचे म्हटले जात होते. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर ही भेट झालीच तर यानंतर काय होणार याची उत्सुकता आहे.
दरम्यान ही भेट कधी होणार याची वेळ निश्चित झाली नसली तरी ही भेट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार आपल्या दैनंदिन कामकाजासाठी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ खडसे सध्या त्यांच्या चर्चगेट इथल्या निवासस्थानी आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांच्याकडे विचारणा केली असता, मी एकनाथ खडसे आहे, लपूनछपून कोणत्याही गोष्टी करत नाही असे बोलून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker