खुलताबाद, (प्रतिनिधी)
समितीच्या सहा गणांसाठी सोमवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारी संगीता सानप, तहसीलदार स्वरूप कंकाळ गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पंचायत समिती सभागृहात पार पडली. आरक्षण जाहीर होताच तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांनी आपल्या मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे.
कही खुशी कही गम ..
काहींनी अपेक्षेप्रमाणे आरक्षण मिळाल्याने आनंद व्यक्त केला, तर काहींना अपेक्षित
: पंचायत गणात आरक्षण न मिळाल्याने निराशा झाली. तर काहींनी आता थेट जिल्हा परिषद निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे.
या आरक्षणात बाजारसावंगी गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग, टाकळी राजेराय सर्वसाधारण, ताजनापूर सर्वसाधारण महिला, गदाना सर्वसाधारण महिला, गल्लेबोरगाव सर्वसाधारण महिला, वेरूळ गणात अनुसूचित जाती सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले. ताजनापूर, गदाना आणि गल्लेबोरगाव या तीन गणांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले. त्यामुळे महिलांना तीन जागांवर संधी मिळाली आहे.
तीन गणांमध्ये झाला बदल या आरक्षणात तीन गणांमध्ये बदल झाला. उर्वरित तीन गणांमध्ये मागील वेळेसारखेच आरक्षण कायम राहिले. २०१७ मध्ये बाजारसावंगी गणात नागरिकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण होते. या वेळीही तेच आरक्षण जाहीर झाले. ताजनापूर गणात अनुसूचित जाती महिलेला आरक्षण होते, आता सर्वसाधारण महिलेसाठी आहे. गल्लेबोरगाव गणात यापूर्वी सर्वसाधारणला आरक्षण सुटले होते. आता सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण सुटले आहे,
वेरूळ गणात यापूर्वी नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला आरक्षण सुटले होते. आता अनुसूचित जाती सर्वसाधारणला आरक्षण सुटले आहे.















