चितेगावात तरुणाची हत्या; आरोपीच्या अटकेसाठी घाटीत काहीकाळ गोंधळ

Foto
औरंगाबाद:  चितेगाव येथे खुल्या जागेवर कब्जा मारणाऱ्या आरोपिना मज्जाव केला म्हणून पाच जनाणी रउफ याकूब शेख वय- ३१ वर्ष वर्षीय तरुणाला मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या  तरुणाच्या मृत्यू नंतर आरोपीच्या अटकेसाठी काही काळ घाटी रुग्णालयात तणाव निर्माण झालं होता.

शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी खुल्या जागेवर अकबर उर्फ मिया महेबूब शेख हा चितेगावातील खुल्या जागेवर अतिक्रमण करीत होता. याला मृताने  विरोध केला असता मिया अनि मुन्ना शेख,चांद शेख,शहानुर शेख, सोहेल शेख(सर्व राहणार चितेगाव) यांनी लोखंडी टॉमी ने मारहाण केली. तेंव्हा पासून त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृत्यू नंतर घाटीच्या शवविच्छेदन गुहाजवळ आरोपिना अटक करावी यासाठी शेकडोचा जमाव जमला होता. पोलिसांनी समजूत घातल्याने प्रकरण निवळला. या प्रकरणी पाच आरोपी विरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker