वॉशिंग्टन : आमच्याकडे अफाट शक्ती, अमर्याद दारुगोळा आणि भरपूर वेळ आहे. आज या नीच लोकांचे काय होते ते फक्त पहा, असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या विधानाने युद्ध लवकर थांबण्याची शक्यताही माळवताना दिसू लागली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत इराणी नेत्यांना पृथ्वी संपवल्याचा दावा केला आहे आणि राहिलेल्यांनाही अमेरिकेचा अध्यक्ष संपवणार असल्याची धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही इराणची दहशतवादी राजवट लष्करी, आर्थिक आणि इतर सर्व मार्गांनी पूर्णपणे नष्ट करत आहोत. पण जर तुम्ही न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्र वाचले, तर तुम्हाला चुकीचे वाटू शकते की आम्ही जिंकत नाही आहोत.इराणचे नौदल संपले आहे, त्यांची वायुसेना आता उरलेली नाही. त्यांची क्षेपणास्त्रे, ड्रोन्स आणि इतर सर्व काही उद्ध्वस्त होत आहे आणि त्यांचे नेते या पृथ्वीवरून पूर्णपणे संपवले गेले आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला.
इराणींना मारणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान
ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, आमच्याकडे प्रचंड ताकद आहे. अमर्याद दारुगोळा आणि भरपूर वेळ आहे. आज या नीच लोकांचे काय होते, ते फक्त पहा. त्यांनी 47 वर्षांपासून जगभरातील निर्दोष लोकांना मारले आहे आणि आता मी, अमेरिकेचा 47वा राष्ट्राध्यक्ष म्हणून, त्यांना संपवत आहे. हे करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, असे सांगत ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.
मोजतबा खामेनेई कदाचित जिवंत आहेत -ट्रम्प
ही पोस्ट करण्यापूर्वी फॉक्स न्यूजचा रिपोर्टनुसार द ब्रायन किल्मीड शोमध्ये ट्रम्प म्हणाले होते की, मला वाटते की, ते (मोजतबा खामेनेई) हे कदाचित (जिवंत) आहेत. मला वाटते की ते जखमी झाले आहेत, पण ते कुठल्यातरी अवस्थेत जिवंत आहेत. ट्रम्प असेही म्हणाले की, देशांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज नेली पाहिजेत. थोडे धाडस दाखवले पाहिजेत. यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही. त्यांच्याकडे कोणतेही नौदल उरलेले नाही आणि त्यांच्या सर्व युद्धनौका बुडवल्या आहेत.
“इराण युद्धामुळे खूप नफा झाला”
ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात नुकसान होते. जीवितहानी होते, मालमत्तांचे नुकसान होते, आर्थिकदृष्ट्याही नुकसान होते. आताच्या घडीला अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मोठे युद्ध सुरू आहे. कोणताच देश माघार घ्यायला तयार नाही. एकीकडे अमेरिका युद्ध जिंकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असला, तरी इराणकडून कारवाया सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. हॉर्मुझ सामुद्रधनुवरून रान पेटले आहे. अशातच इराण युद्धामुळे अमेरिकेचा मोठा फायदा झाला, अशी कबुली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक विधान चर्चेत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती अमेरिकेला आर्थिक फायदा देऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
जेव्हा तेल महाग असते, तेव्हा आपण खूप पैसे कमवतो
सोशल मीडियावर ट्रम्प म्हणाले की, अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, म्हणून जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा देश अधिक कमाई करतो. जेव्हा तेल महाग असते, तेव्हा आपण खूप पैसे कमवतो. आमची प्राथमिकता इराणला अण्वस्त्रे मिळविण्यापासून रोखणे आहे. तसेच दुसरे ध्येय पैसे कमविणे हेही आहे, परंतु जागतिक शांततेसाठी इराणवर दबाव आणत आहेत.
दरम्यान, संघर्ष, युद्ध आणि तणावामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास व्यापार करत आहे. एक महिन्यापूर्वी हेच दर ७५ डॉलर प्रति बॅरल होते.