संत एकनाथ महाराजांवरील संशोधनाबद्दल कृष्णा काळे यांचा सत्कार

Foto
पैठण, (प्रतिनिधी): नांदर येथील रहिवासी कृष्णा बबनराव काळे यांनी संत एकनाथ महाराज यांच्या जीवनकार्यावर पीएच. डी. पदवी प्राप्त केली असून त्यांची संतपीठ, पैठण येथे प्राध्यापकपदी नियुक्ती झाली आहे. त्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कृष्णा काळे यांनी संत एकनाथ महाराज यांच्या कार्यावर केलेल्या 1. संशोधनाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातून उच्च शिक्षण गे घेत संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून प्राध्यापकपद मिळवल्याने ना नांदर गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. 

या सत्कारप्रसंगी उपसरपंच आसमान काळे, राजे संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील सदावर्ते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल पाटील काळे, सोसायटीचे संचालक दादासाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर चिंधे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मगरे, रोजगार सेवक अक्षय राऊत, राजू गवारे, लहूबाबा तळपे, मच्छिंद्र नरवडे, गणेश शेळके, संभाजी पानखडे, समाऊली सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी उपस्थितांनी कृष्णा काळे यांचे अभिनंदन करून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात यापुढेही उल्लेखनीय कार्य करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.