आमदार निधीतून बनवलेलेले रस्तेही केले उद्ध्वस्त
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहर व परिसरात बेकायदेशीर प्लॉटिंग करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा तीव्र केला आहे. देवळाई, पडेगाव आणि मिटमिटा येथील कारवाईनंतर शनिवारी (दि. २९) मनपाच्या पथकाने हसूल-अंबरहिल परिसरातील गट क्र. २४७ मधील मुबारक पार्क नावाच्या अनधिकृत प्लॉटिंगवर थेट जेसीबी चालवून ते उद्धस्त केले. विशेष म्हणजे, या अनधिकृत प्लॉटिंगमध्ये चक्क आमदार निधीतून तयार करण्यात आलेले रस्तेही उखडून टाकण्यात आले आहेत.
या मोहिमेनंतरही शहरात कुठेही अनधिकृत प्लॉटिंग सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित
पाच एकरवर जमीन निष्कासित
▶ मनपा पथकाकडून गट क्रमांक २३४ मध्ये ५.८ एकरवर साधारण २९० अनधिकृत व अवैध प्लॉट्सवरील खुणा-हद्दी हटविण्यात आल्या. तर गट क्रमांक २४७ व २४९ मध्ये २२ एकरवरील साधारण ६५० अनधिकृत व अवैध प्लॉट्सवरील खुणा हद्दी निष्कासित करण्यात आल्या.
अपनी अलीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनग
वॉर्डाचे पदनिर्देशित अधिकारी आणि इमारत निरीक्षक यांना थेट जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावरच कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान अतिक्रमण
विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनात येथे कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र देसाई यांच्यासह नागरी मित्र पथक आणि मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साहाय्याने ले-आऊटचे केलेले सीमांकन आणि अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












