बाबाजींच्या पुण्यस्मरणाला लाखो भाविकांची गर्दी

Foto
 सोहळ्याची भव्य सांगता : ७५१ साखर पोत्यांचा महाप्रसाद

खुलताबाद, (प्रतिनिधी) : : निष्काम कर्मयोगी जगदुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज याच्या ३६ व्या पुण्यस्मरण निमित्त श्रीक्षेत्र वेरूळ येथे जगदूरु जनशांती धर्म सोहळा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. गेल्या सात दिवसात देशभरातील भाविकांसह थोर संत महंत, मंत्री च विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येथे उपस्थिती लावली. आज या भव्य सोहळ्याची सांगता होत असून श्री बाबार्जीच्या कर्मभूमीमध्ये भाविकांची व मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली.
श्री संत जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी जगद्वरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली २५ नोव्हें‌बरपासून हा सोहळा सुरू आहे. लाखो भाविकांनी भेट दिली आहे. सांगतेच्या पूर्वसंध्येला वेरूळमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली.


अनुष्ठानासाठी ११ हजार भाविक बसले आहेत तर ७५१ कुंडी शिवशक्ती मनोवांच्छित
अतीरुद्रस्वाहाकार महायज्ञ कार्यक्रमात २५ हजार भाविक उपस्थित होते. यासह अखंड नंदादीप, अमिषेक, हस्तलिखित जप साधना, नमसंकीर्तन, भागवत पारायण, श्रमदान या कार्यक्रमात देखील हजारो माविकांनी आपली उपस्थिती लावली. कार्यक्रमाचा शुभारंभराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. तर गेल्या आठ दिवसात देशातील विविध संत व मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाची सांगता होणार असून अनुसयांना त्याच्या मोहन रथाची देखील सांगता होणार आहे. यासाठी संत महंत देखील उपस्थित आहेत.

सोमवार (ता.१) रोजी अंबादास दानवे, फुलंब्रीचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी कार्यक्रमाला भेट देऊन शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेलले, तर सकाळच्या सत्रात जम्मू काश्मीर येथील अनंत श्री विभूषित अटल आखाडा पिठाधीश्वर राजगुरू आचार्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ स्वामी विश्वात्मानंद सरस्वती यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. 

कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सत्रात राजेश सरकटे प्रस्तुत स्वर विहार मंचाने बाबाजींची सुमधुर भजने सादर केली. आज कार्यक्रमाची सांगता होणार असून बाबांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी होण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्यावतीने राजेंद्र पवार यांनी केले आहे.

७५१ साखर पोत्यांचा बुंदी, २५१ पोते तांदूळाचा महाप्रसाद :  २५ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या सोहळ्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकासाठी २१०० पोते शेव मुरमुऱ्याऱ्यांचा चिवडा प्रसाद म्हणून वाटण्यात आला. तर सांगतेप्रसंगी लाखो भाविकांची उपस्थिती बघता ७५१ साखर पोते बुंदी महाप्रसाद व २५१ पोले तांदळांचा मसालेभात अशी प्रसाद व्यवस्था केली आहे. आज सकाळी आठ वाजता परमपूज्य बाबाजर्जीच्या पादुकांचे बांदीच्या स्थांमधून हजारो अनुष्ठानार्थी व लाखो भक्त परिवाराच्या उपस्थितीमध्ये येरूळ नावातून भव्य शोभायात्रा सकाळी निघणार आहे. यासह भाविकांची गर्दी पाहता महाप्रसाद तयार करण्यात आला असून प्रत्साद वितरण व्यवस्थेसाठी शेकडो स्वयंसेवकांची नियुक्ती केलेली आहे.

देशभरातील संत महंतांची उपस्थिती :
वाराणशी येथील अखिल भारतीय संत समितीचे महासचिव श्री. स्वामी जितेंद्रानंदजी सरस्वती महाराज, सदगुरू योगिराज गंगागिरी महाराज संस्थान, सराला बेटचे श्री महंत स्वामी रामगिरीजी महाराज, भारतानंदजी सरस्वती महाराज, स्वामी योगीराज दयानंद महाराज, (सेलगाव, सिल्लोड), महामंडलेश्वर डॉ. संतोषानंद देवजी महाराज (हरिद्वार), स्वामी देवानंदगिरीजी महाराज, स्वामी सुरेशानंदगिरी महाराज (ऋषिकेश), साध्वी आका महाराज, शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी (पैठण), स्वामी शंकरानंद सरस्वती (अंबकेश्वर) भाजपा महाराष्ट्र प्रदेश आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले, ह.भ.प. श्री जनार्दन महाराज मेटे, महामंडलेश्वर डॉ. श्री. रामकृष्णदास लहवितकर महाराज, बाबाजीच्या परंपरेतील संत श्री श्री १००८ परमानंदगिरीजी महाराज (मांगसी माता गड). संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त महत योगी निरंजननाथजी, रामकृष्ण मिशन (सकवार, मुंबई) चे स्वामी तत्वस्वरूपानंदजी महाराज, श्री संत सदगुरू बागडे बाबा संस्थान (मारोळी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील प्रमुख संत संदेश महताज यांची विशेष उपस्थिती होती.