शेवटच्या श्रावण शनिवारी भद्रा मारुतीच्या चरणी लाखो भाविकांची मांदियाळी

Foto
दहीहंडीनिमित्त भद्रा मारुतीची आकर्षक सजावट; भाविकांसाठी संस्थानासह प्रशासन सज्ज

खुलताबाद, (प्रतिनिधी) :  महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भद्रा मारुती मंदिरात शेवटच्या श्रावण शनिवारी भक्तीचा महासागर उसळला. पहाटेपासूनच भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ङ्गजय भद्रा मारुतीफ ङ्गजय श्रीरामम, ङ्गहनुमान महाराज की जयफ अशा जयघोषाने संपूर्ण खुलताबाद नगरी दुमदुमून गेली होती.

श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक खुलताबादमध्ये दाखल झाले. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगेत उभे राहत मनोभावे भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रावण महिन्याच्या अखेरच्या शनिवारी भद्रा मारुतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या लाखों भाविकांमुळे खुलताबाद नगरी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने फुलून गेली होती. जय भद्रा मारुतीफप्रच्या जयघोषात श्रावणाचा अखेरचा शनिवार अविस्मरणीय ठरला.

-- पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त -- 
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर, शहरातील प्रमुख मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस कर्मचारी व प्रशासनाच्या नियोजनामुळे भाविकांना दर्शनासाठी सुरळीतपणे जाता आले. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात आली.

-- दहीहंडीनिमित्त भद्रा मारुतीची मनमोहक सजावट -- 
शेवटच्या श्रावण शनिवारी तसेच दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर भद्रा मारुतीच्या मूर्तीला आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली होती. बासरी, मोरपिसे, दहीहंडी तसेच विविध रंगांची आकर्षक फुले यांचा वापर करून करण्यात आलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. 

फुलांच्या सजावटीत नटलेले भद्रा मारुतीचे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी झाली होती. मंदिरातील आकर्षक सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे भाविकांच्या आनंदात आणखी भर पडली. अनेक भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील सजावटीचे मनोहारी दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले.