जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला मुंबईत बेड्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : बनावट जीपीए (कुलमुखत्यारपत्र) तयार करून सिल्लोड येथील एका व्यापाऱ्याकडून तब्बल १ कोटी ९० लाखांहून अधिक रुपये उकळून गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला मुंबईतून, तर इतर दोघांना शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सिल्लोड येथील आडत व्यापारी शेख इम्रान (वय ३७) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी शेख इरफान याने हिमायतनगर येथील गट क्रमांक १९/१ मधील जमिनीचा सौदा २ कोटींत केला असून, गुंतवणुकीसाठी २५ लाख रुपये कमी
पडत असल्याचे सांगून त्यांच्याकडून आरटीजीएस, फोन-पे आणि रोख स्वरूपात एकूण १ कोटी ९० लाख २५ हजार उकळले. पैशाच्या बदल्यात हिमायतनगर येथील ले-आउटमधील प्लॉट क्रमांक ९० आणि ९१ देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर मात्र प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पुन्हा आरोपींनी १६ एकर जमिनीचे कुलमुखत्यारपत्र इम्रानच्या नावे केले. मात्र, ही जमीन आधीच दुसऱ्याला विकलेली असल्याचे चौकशीत उघड झाले. सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात
निवृत्त उपनिरीक्षकालाही गंडा
मुख्य आरोपी शेख इरफान शेख शफीक, त्याचा भाऊ शेख सलमान शेख शफीक, आई गौसिया बेगम शेख शफीक, वडील शेख शफीक ऊर्फ शेख साहब (सर्व रा. दिल्ली गेटजवळ), शेख जमील शेख गुलाम रसूल (३४, रा. रोजेबाग) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) या टोळीने निवृत्त उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांच्यासह त्यांच्या मित्राला वेगवेगळ्या जमिनी, फ्लॅट, दुकाने देण्याच्या बहाण्याने अशाच प्रकारे सुमारे १ कोटी ३३ लाख रुपयांचा गंडा घातला. या टोळीवर तीन गुन्हे दाखल आहेत.
आला होता. तेव्हापासून शेख इरफान फरार होता. मुंबईतील वर्सों वा येथून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. दुसरा आरोपी शेख जमील याला ९ एप्रिलला अटक केली.
निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक सचिन देशमुख, अंमलदार सय्यद शकील अहेमद, बाळासाहेब राठोड, विजयानंद गवळी, गणेश शिंदे, सखाराम मोरे, कृष्णा शिंदे आणि संदीप जाधव यांनी कारवाई केली.